ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा


१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काही ना काही कीडे केलेले असतात. त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात 🙂

२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही 🙂

३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.

शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट 🙂

शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट …काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात 🙂

४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने.

शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek साठी भेटण्याची जागा.

शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand

शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह

५.अन्य विशेष लकबी:हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसऱया club बरोबर ट्रेकला जातात 🙂

ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत …. साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात 🙂 त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते 🙂

बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी

यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी 🙂 यांचा waste pouch ही एक धमाल चीज असते : यात calculator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला 🙂 सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

६.खाण्या पिण्याच्या सवयी:

कशालाही नाही म्हणणार नाहीत 🙂 हवे ते हक्काने मागून घेणार 🙂

काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी 🙂

पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

खणखणित आवाजात पोवाडे गाणे

जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे

बैटिंग ला जाणे :)(बॅटिंग म्हणजे क्रिकेटमधील नाही. सक्काळी सक्काळी खुल्या आभाळी एखाद्या आडोशाच्या पिचवर जी होते ती.)

८.यांची दैवते:

off course शिवाजी महाराज

रायगडचा जगदीश्वर

हरिश्चंद्र गडाचा ख

Leave a Reply