Rajmachi Fort 02 – किल्ले मनरंजन

श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला स्वयंसिद्ध अशी रक्षणाची साधने नसल्याने त्याच्या सभोवार मजबूत तट घातला आहे. एकापाठोपाठ तीन दरवाजांतून मनरंजनमध्ये प्रवेश करावा लागतो.
गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात.या गडावरही पाण्याचा भरपूर साठा आहे, पाण्याचा भरपूर साठा असणे हे त्या काळी त्या गडाचे महत्व दाखवते .एका दिवसात हे दोन्ही किल्ले तसेच त्याच्या आसपास चा परिसर पाहून होतो .

Leave a Reply