TREK TO KALSUBAI HIGHEST PEAK OF MAHARASHTRA(कळसुबाई शिखर)

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.
नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून
घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण.

Leave a Reply