Ghangad fort – घनगड किल्ला

मुळशी धरणाच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या कोरसबारस ह्या मावळ प्रांतात आड बाजूला हा घनगड किल्ला आढळतो. तसा इतिहासात ह्या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही.
मुंबई तसेच पुण्यापासून जवळ असल्याने हा किल्ला एका दिवसात पाहता येतो.

आपल्याला एकोले ह्या गावातून एक मळलेली वाट किल्ल्यापर्यंत घेऊन जाते. तिथून पुढे शंकर मंदिराचे अवशेष आणि गारजाई देवीचे मंदिर दिसते. गारजाई मंदिर समोर एक दीपमाळ आणि काही वीरगळ अवशेष आपल्या दृष्टीस पडतात. गारजाई मंदिराकडून डाव्याबाजूची वाट आपल्याला थेट किल्ल्यावर घेऊन जाते. तिथून पुढे गडाच्या प्रवेश दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करता येतो . बालेकिल्ल्यात जाण्याचा मार्ग थोडा कठीण आहे, पण शिवाजी ट्रेल या ग्रुप ने चढाई सोपे होण्यासाठी एक लोखंडी शिडी उभारली आहे.परंतु पावसाळ्यात बालेकिल्ल्यावर जाणे थोडे जोखमीचे आहे.

Leave a Reply