Ganpati Visarjan 2014 Bhandup Mumbai

।। बाप्पा साईहिलचा, राजा मनाचा ।।
सार्वजनिक उत्सव समिती, साई हिल, भांडूप (प.) या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे “‘सुवर्ण महोत्सवी” वर्ष असल्याने मोठ्या जल्लोषात यंदाचा उत्सव साजरा केला गेला. ‘महाराष्ट्र टाइम्स” या वृत्तपत्राने संबोधलेले “‘मिनी लालबाग”‘ साई हिल, भांडुप, विभागातील सार्वजनिक उत्सव समिती मंडळाचा “सिंहासनाधीश्वर'”.
मिनी लालबाग अशी ओळख असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या “गणराया’च्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
“सिंहासनाधीश्वर'” गणराया’चा भव्य असा मिरवणूक सोहळा ‘शिवाजी तलाव” भांडुप येथे पार पडला.
Ganesh Devotees asked lord Ganesha to come early next year.
Ganpati Visarjan ( Immersion ) took place in very peaceful manner at ( Shivaji Talav ) Bhandup, Mumbai.

BHANDUP CHA MAHASARVESHVAR GANPATI ( atul gonjare )

ढोल-ताशांचा गजर सुरू झालाय… फटाक्यांची आतषबाजी सुरू झालीय… गुलालाची उधळण होतेय… डीजेंचा दणदणाट सुरू झालाय… निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, अशी प्रार्थना सुरू झालीय… परंतु हे काय आश्चर्य… गणपतीबाप्पा निरोप घ्यायलाच तयार नाही. जागेवरून अजिबात हलायला तयार नाही. मंडपातच ठाण मांडून बसला आहे…

हे चित्र आहे भांडूप येथील टेंभीपाडा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील… यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणा-या टेंभीपाडा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जंगी तयारी केली होती. परंतु आश्चर्य म्हणजे जवळपास तीन-चार तास सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी आणि २०-३० कंत्राटी कामगारांनी शर्थीचे प्रयत्न करूनही गणपतीबाप्पा जागेवरून अजिबात हलले नाहीत. कार्यकर्त्यांनी गणपती मंडपाबाहेर काढण्याचे अतोनात श्रम घेतले. परंतु २२ फूट उंचीच्या या बाप्पाला जागेवरून हलवणे त्यांना काही जमले नाही.

गणपतीबाप्पाच्या या ‘ ठिय्या आंदोलना ‘ मुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गणपतीबाप्पा रूसले की काय, हे जाणून घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ एका भटजीकाकांना पाचारण केले. या गणेशाचे घाईघाईत विसर्जन करू नका. आधी शांती करा… त्यासाठी पूजा करा आणि येत्या रविवारी संकष्टीला बाप्पाचे विसर्जन करा, असा सल्ला भटजीकाकांनी दिला. त्यानुसार आता येत्या २६ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस सुनील मोरे यांनी दिली.

यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आम्ही २२ फूट उंचीची विशेष गणेशमूर्ती बनवून घेतली आहे. त्यामध्ये बाप्पाची विविध स्वरूपातील २५१ रूपे दाखवण्यात आली आहेत. या गणपतीचे वजन साधारण ३ टन आहे. चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तेव्हा कार्यकर्त्यांनी अगदी सहजपणे गणपती उचलून आणला होता. परंतु विसर्जनाच्या वेळी मात्र गणपती काही केल्या जागचा हलेना… असे मोरे यांनी सांगितले. हा गणपती पाहण्यासाठी आता भाविकांची मोठी रीघ लागली आहे.