फाटक व्याख्यानमाला

। श्री ।

नमस्कार,

सर्वांना कळविण्यास आनंद होतो की ह्या वर्षीपासुन एक नविन उपक्रम आम्ही आमच्या घरात चालू करत आहोत.

ह्यामागचा विचार असा आहे की आत्ताच्या लोकांसमोर व्याख्यानामार्गे इतिहास, विचार तसेच आपल्या आजुबाजुला घडामोडींवर चर्चा घडवुन आणण्याच्या दृष्टिने एक पाऊल…. तशी कल्पना सुचण्यामागचे कारण म्हणजे, एकदा मी आणि रश्मी घरी बोलत होतो व्याख्यान आणि व्याख्याते विषयावर. मी तिला सांगीतले की लहानपणी आम्ही रस्त्यात बसुन प्रा. भोसले, श्री. बेडेकर अश्या लोकांची व्याख्याने ऐकत असत. पणं सध्या अशी व्याख्याने होत असतील? मग ऐकदा बेलबाग चौकात श्री. अशोक फडणीस ह्याच्या घरी नाना फडणविस ह्यांच्या पुण्यतिथीला आयोजित केलेले घरच्या घरी छोटेसे व्याख्यान. ही कल्पना मला आवडली आणि रश्मीशी बोलुन असा उपक्रम ह्यावर्षी पासुन आपल्या घरातुन सुरु करावा असे ठरले.

ह्या वर्षी श्री छत्रपति शिवाजी महाराज ह्याच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन ह्या वर्षीपासुन “फाटक व्याख्यानमाला” सुरु करत आहोत. तसेच ही व्याख्यानमाला दरवर्षी जुन महिन्यामध्ये पहिल्या शनिवार-रविवार असेल.
ह्यावर्षीचा विषय आहे “कवीराज भुषण – एक परिचय”. प्रमुख व्याख्याते आहेत श्री. हर्ष परचुरे. ह्यांचा कवी भुषणांवर उत्तम अभ्यास असुन त्यांचे “ब्रज” भाषेवर चांगले प्रभुत्व आहे.
आपणां सर्वाना माझे सस्नेह आमंत्रण आहे की आपण सर्वांनी ह्या व्याख्यानाला उपस्थित रहावे. कृपया आपली उपस्थिती २८ मे २०१२ कळवावी, जेणेंकरुन आम्हाला योजना करता येईल.

 
“फाटक व्याख्यानमाला”
विषय: कवीराज भुषण – एक परिचय
वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३०
दिनांक: २ जुन २०१२.
स्थळ: सी-७०२, महेश गॅलेक्सी, वडगावं बुद्रुक, सिंहगड कॅ।लेज रोड. जवळची खुण मिनाक्षी पुरम, पुणे ४११०४१.
भ्र.ध्व. क्रं.: ९८२३३ ००७२४.

आपला,
योगेश रत्नाकर फाटक.

Leave a Reply