मानगड श्रमदान मोहीम १७/६/२०१२

“मानगड श्रमदान मोहीम”

सेवेच्या ठाई तत्पर… दुर्गवीर निरंतर..
दुर्गवीर सोबत श्रमदान आणि श्रमदानासोबत समाजकार्य…..

दिनांक १७/६/२०१२ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने राबविण्यात आलेल्या दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत “किल्ले मानगड” वर दुर्ग दर्शन, श्रमदान व आदिवासी वस्तीत शालेय वस्तू वाटप करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई व पुणे च्या वतीने सुमारे ३५-४० दुर्गवीरांच्या मदतीने किल्ले मानगड वर श्रमदान करण्यात आले. सदर श्रमदाना च्या वेळी किल्ल्याच्या मागच्या बाजुला एक शिवकालीन चोर दरवा…जा मिळाला त्याच्या ६-७ पाय-या स्पष्ट दिसतील अश्या पद्धतिने स्वच्छ करण्यात आल्या. कालानुरूप त्या पूर्णपणे जमिनीत गाडलेल्या होत्या. श्रमदाना सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात गरीब मूलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर मोहिमेत मुंबई सोबत पुणे च्या दुर्गवीरांनी विशेष मेहनत घेतली.

यापुढच्या प्रत्येक मोहिमेत असेच सहकार्य देऊन जास्तीत जास्त जणांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले..
संपर्क:-
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१ (मुंबई )
नितिन पाटोळे :- ८६५५८२३७४८ (मुंबई )
प्रीति घुले:- ८२९१८६२१३५ (मुंबई)
शैलेश कंधारे :- ९९२३४९३५०६ (पुणे)

Durgaveer Pratishthan

Leave a Reply