ALANGAD, MADANGAD & KULANGAD IN ONE DAY

नमस्कार मित्रांनो,

१५ वर्षांपूर्वी अलंग, मदन व कुलंग हे तीन किल्ले एका दिवसात केले होते. पण ते नेहमीच्या वाटेने. शिवाय कुलंग गडावर पोहोचायलाच संध्याकाळ झाली. रात्री कुलंग गडावर मुक्काम करायला लागला. मला तर ते किल्ले एका दिवसातच करून खाली उतरायचे होते. पण इतर मोहिमांमुळे परत काही तो योग जुळलाच नाही.

गेल्या १०/११ मार्च रोजी मदन पासून कुलंग गडावर जाण्यासाठी जवळचा मार्ग शोधून काढला. अन परत एकदा जुन्या आठवणीने उचल खाल्ली. म्हटले स्वप्न सत्यात येण्याची शक्यता आहे. चालण्यात तसेच प्रस्तरारोहणात तरबेज असणाऱ्या सिद्धार्थ वराडकर (वय २७ वर्षे) व सुरज मालुसरे (वय २१ वर्षे) या दोघांचीच निवड केली. माझे वय त्यांच्या बरोबर दुप्पट होते (वय ५४ वर्षे). अलंग ची कातळ भिंत स्वतंत्रपणे चढण्याची क्षमता तिघांमध्येही होती. ही मोहीम मला ऐन मे महिन्यातच करायची होती. मे महिन्यातच खरा कस लागतो.

शनिवार दिनांक १९ मी रोजी रात्री आम्बेवाडीला पोहोचलो. रविवारी २० तारखेला संपत चंदर ठवळे च्या घरापासून (झाप) सकाळी ०५:४५ वाजता चढायला सुरुवात केली. ०६:३० वाजता अलंग-मदन च्या कोल मध्ये पोहोचलो. ०७:०८ वाजता सुरजने प्रस्तर चढायला सुरुवात केली. ०७:२२ वाजता तो ४५ फुटांची कातळ भिंत लीलया चढून गेला.०७:५३ वाजता अलंग गडाची गुहा गाठली. ०८:०९ वाजता अलंग गडाच्या सर्वात उंच टोकावर पोहोचलो. वाटेतील हौदान्मधून पाणी भरून घेतले. ०८:४० वाजता परत गुहेपाशी पोहोचलो. ०९:२५ वाजता कोल मधे आलो. ०९:३४ मदनच्या कड्यापाशी पोहोचलो. मदनचा कडा मी सर केला. १०:२० वाजता मदनचे शिखर गाठले. मदन उतरून ११:०२ वाजता परत कोल मधे आलो. आम्ही शोधून काढलेल्या नवीन वाटेने म्हणजेच कोल मधूनच मदन गडाच्या डाव्या अंगाने मदन गडाला व पुढील सुळक्यांना वळसा घालत कुलंग गडाच्या कड्यापाशी ११:५२ वाजता पोहोचलो. १२:१९ वाजता कुलंग गडासाठी खालून वर येणाऱ्या नेहमीच्या वाटेला पोहोचलो. १२:४५ वाजता कुलंग गडाच्या टोकावर पोहोचलो. पोटभर जेवण केले. छानपैकी आंघोळ केली. अन ०१:३९ वाजता गडावरून परतीला लागलो. पायथ्याच्या आंब्यापाशी ०२:४१ ला पोलोचालो. ०३:१९ वाजता संपत चंदर ठवळे च्या घरापाशी येऊन थडकलो.

वरील मोहीम आम्ही ९ तास ३४ मिनिटात पूर्ण केली.

पोळी-भाजी, थेपले, द्राक्ष, मोसंबी, काकडी, हापूस आंबे, खारातले आवळे, प्रत्येकी दीड लिटर पाणी व प्रस्तर-चढाइचे साहित्य सोबत घेतले होते. १० वाजल्यानंतर ऊनाची तीव्रता जाणवू लागली. त्याचा परिणाम चढाई करताना जाणवला.

मोहिमेतील सदस्य – अरुण सावंत (मोहीम प्रमुख), सिद्धार्थ वराडकर, सुरज मालुसरे

=============================

Hi friends,

Proud to announce you that we succeeded in completing three forts (Alangad, Madangad & Kulangad) in one day – 20th May 2012.

Team members : 1) Arun Sawant – Leader (age 54 years) 2) Siddharth Varadkar (age 27 years) 3) Suraj Malusare (age 21 years). We all were capable of climbing Alangad & Madangad rock wall. To feel the real intensity of this trek, we decided to do it during mid-May.

Reached Ambewadi by vehicle on Saturday 19th May night.

On 20th May we started our trek from Sampat Chandar Thavale’s House at 05:4 am – reached Alang-Madan Col at 06:30 . At 7:08 Suraj started climbing the 45′ Rock-patch of Alangad – reached top at 7:22 – reached Alangad Cave at 7:53 – Alang Summit at 08:09 am – We returned to Cave at 08:40 – reached the Col at 09:25 – reached Madangad rock-patch at 09:34 – Madangad summit at 10:20 – again reached the Col at 11:02 am – Then followed the New Explored Route in which took traverse from the left side of Madangad and reached Kulagad wall at 11:52 am – reached to Kulangad regular route at 12:19 – Kulangad top at 12:45pm. Took a lunch break & had a refreshing bath . Started getting down at 01:39 – reached the Base Mango Tree at 02:41 – reached Sampat Chandar Thavale’s House at 03:19 pm.

Total time taken – 9 hours 34 minutes.

Anyone interested in doing this trek may contact me on +919869474343 or +919869464343

Leave a Reply