Home >> सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३ : १५ व १६ जून २०१३ – ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई

सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३ : १५ व १६ जून २०१३ – ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई

Thursday, May 30th, 2013 | mumbaihikers | Uncategorized

आग्रहाचे निमंत्रण

मित्रांनो,
आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की आपण सर्व इतके दिवस आतुरतेने वाट पाहत असलेले ‘सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – २०१३’ची तारीख नक्की झाली आहे. आपले हे लाडके संमेलन या वर्षी जून महिन्याच्या शनिवार-रविवारी, १५ व १६ तारखेला आपल्या भेटीसाठी येत आहे.
स्थळ: मजला, ब्राह्मण सेवा मंडळ, दादर, मुंबई.
या वर्षीच्या ‘सह्याद्री मित्र’ स्नेह संमेलनात आपण पुढील कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता.
(कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे)
संमेलन, शनिवार दिनांक १५ जून २०१३ रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल आणि ते रविवार दिनांक १६ जून २०१३ रोजी रात्रौ ०८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी १०:३० वाजल्यापासुनच ‘महाराष्ट्राची दुर्गरत्ने’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. संमेलनाचाच एक भाग असणाऱ्या ‘सह्याद्री मित्र छायाचित्रण स्पर्धा – २०१३’मध्ये भाग घेतलेल्या छायाचित्रकारांनी पाठवलेल्या छायाचित्रांमधील निवडक ५० छायाचित्रे या प्रदर्शनात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
या दरम्यान प्रसिद्ध इतिहाससंशोधक माननीय श्री. अप्पा परब लिखित पुस्तकांच्या प्रदर्शनाचा लाभही प्रेक्षकांस होणार आहे. कित्येक दशके स्वतः भ्रमंती करून संपादित केलेल्या माहितीचा खजिना या पुस्तकांद्वारे माननीय अप्पांनी गिरि-दुर्गप्रेमींसाठी खुला केला आहे. प्रदर्शनात आवडलेली पुस्तके अल्प दरात प्राप्त करून गिरि-दुर्ग प्रेमींना आपल्या माहितीत नवीन भर घालता येणार आहे.
गिर्यारोहण, प्रस्तरारोहण किंवा पर्यटनाची आवड असणाऱ्या मंडळींसाठी, ‘स्ट्रॉब शॉप’तर्फे, उपयुक्त आणि आवश्यक असे, उच्च गुणवत्ता असलेले साहित्य प्रदर्शन आणि विक्रीस ठेवण्यात येणार आहे. कित्येक वर्षे गिर्यारोहण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, अनुभवी व्यक्तींतर्फे हे शॉप सुरु करण्यात आले आहे त्यामुळे दर्जेदार साहित्य मिळण्याची ही संधी मुळीच सोडू नका.
दोन्ही दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून व्याख्यान आणि स्लाईड-शो आयोजित करण्यात येणार आहेत. व्याख्यान आणि स्लाईड-शोसुद्धा विनामुल्य असली तरीही मर्यादित जागा असल्याने त्यांना उपस्थित राहण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना उपस्थित राहावयाचे आहे त्यांनी शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पूर्व-नोंदणीचा अर्ज भरावा.
व्याख्यान आणि स्लाईड-शो:
दिवस पहिला – दिनांक १५ जून २०१३:
१५:०० – १५:३० : सह्याद्री मित्र – एक ओळख
१५:३० – १६:३० : महाराष्ट्रातील किल्ले
१६:३० – १७:०० : मध्यांतर
१७:०० – १८:०० : दुर्गवीर – ध्यास दुर्गसंवर्धनाचा
दिवस दुसरा – दिनांक १६ जून २०१३:
१५:०० – १६:०० : गिर्यारोहणातील खबरदारी
१६:०० – १६:३० : गिर्यारोहण आणि योगाभ्यास
१६:३० – १७:०० : मध्यांतर
१७:०० – १८:०० : सह्याद्री मित्र पुरस्कार वितरण सोहळा
(व्याख्यान आणि स्लाईड-शोसाठी उपस्थित राहण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
FACEBOOK – ROCK CLIMBERS CLUB
  

Leave a Reply

%d bloggers like this: