Home >> १२ वे गिरिमित्र संमेलन ६ आणि ७ जुलै २०१३

१२ वे गिरिमित्र संमेलन ६ आणि ७ जुलै २०१३

Monday, June 10th, 2013 | mumbaihikers | Uncategorized
नमस्कार गिरिमित्रानो,
यंदाच्या वर्षी थोडासा उशीरच झाला. 
आपण ट्रेक ठरवतो, निघेपर्यंत अनेक बदल होतात, हा आला तो नाही आला, गाडी मिळते, चुकते, पण काही झाल तरी ठरलेल्या ट्रेकला आपण जातोच. यंदा काहीस असेच झालंय. पण एकदा ठरवल की जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात संमेलन होणार म्हणजे होणारच. 
१२ वे गिरिमित्र संमेलन ६ आणि ७ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न होणार आहे. प्रस्तरारोहणात अनेक जागतिक विक्रम केलेले आणि बिग वॉल क्लाईबिंगमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे एली चेविक्स विशेष अतिथी म्हणून संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना "सह्याद्रीतील जीवनस्त्रोत – जलस्त्रोत आणि देवराई" या काहीशा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर आधारित आहे. 
संमेलनाच्या सविस्तर माहिती पत्रकासाठी खालील लिंक पाहणे 
जागा मर्यादित असल्यामुळे त्वरित आपले नाव नोंदवावे
आयोजक 
१२ वे गिरिमित्र संमेलन 
संमेलन प्रवेश पत्रिका मिळण्याचे ठिकाण
१. महाराष्ट्र सेवा संघ: जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८०, दूरध्वनी: ०२२-२५६८१६३१ – वेळ: सोमवर ते शनिवार: १०.३० ते ७.३० व रविवार १०.३० ते १२.३०
२. गिरीविहार – C/o लागू बंधू मोतीवाले, 'भागीरथी निवास', पहिला मजला, एन सी केळकर रोड दादर (प), मुंबई ४०० ०२८, दूरध्वनी: ०२२- २४२२७७२६ / २४२२९१५२ 

Leave a Reply