३४० शिवराज्याभिषेकसोहळा, रायगड (340 Shiv Rajyabhishek Sohala)

“शतकांच्या यज्ञातूनी उठली
एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामाधुनी,
अरुणोदय झाला”

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४० वा शिवराज्याभिषेकदिनोत्सव सोहळा तिथि नुसार “ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस ” दिनांक २१ जुन २०१३ रोजी संपन्न होत आहे.श्री शिव राजाभिषेकदिनोस्तव सेवा समिती दुर्गराज रायगड समिती यांच्यातर्फे या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीनृपशालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शु १३, सूर्योदयापूर्वी तीन घटिका, शिवाजीमहाराज छत्रपती झाले, सिंहासनावर विराजमान झाले.

‘मराठा राजा छत्रपती जाहला, हि गोष्ट सामान्य जाहली नाही’…
वारंवार होणाऱ्या आक्रमणांनी आणि पराभवांनी खचलेल्या, क्षात्रतेज लोप पावलेल्या, भूमीवर पाच परकीय सत्तांना दाबून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रभूमीत आनंदाचा कल्लोळ उसळला…

मंगल पवित्र क्षण ,आपल्या अस्तित्वाला वेगळेच कोंदण देणारा तो क्षण त्या मंगलदायी सोहळ्याची आठवण म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा राज्याभिषेक सोहळा ,आपण सर्व शिवभक्तानी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा.

इच्छुक शिवभक्तांना ह्या सोहळ्यास उपस्थित राहणे सोयीचे व्हावे यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची रूपरेखा

* गुरुवार दिनांक २० जुन २०१३ रोजी रात्रौ ७ वा दादर येथुन शिवतिर्थ किल्ले रायगड येथे प्रस्थान…

* पोहचल्यावर अल्पशा विश्रांती नंतर किल्ले रायगड चढाई….

*पहाटे ५.३० वा शिवप्रतिमा पुजन, अभिषेक व सिंहासनारोहण ( राजसभा)…

* सकाळी ७.३० वा श्री पालखी व मिरवणुक
(होळीचा माळ, श्री जगदीश्वर प्रासाद)….

* सकाळी ११ वा महाप्रसाद व सांगता

*दुर्गदर्शन

*दुपारी २ वा गड उतरण्यास सुरुवात…..

* संध्याकाळी मुंबईकडे प्रस्थान ….

दुर्गभ्रमण फी :- ६००/- रु प्रत्येकी

( यात मुंबई- किल्ले रायगड-मुंबई बस प्रवास , सकाळचा नाश्ता आणि चहा )

महत्वाचे …
शिवभक्तांचा प्रतिसाद पाहता
आगावू रक्कम भरून आपण आपली सीट आरक्षित करणे आवश्यक आहे.

*** यावेळी श्रमदान कार्यक्रमाचे पण आयोजन केले आहे.

येताना घेवून येण्याच्या वस्तूची यादी

१) पाठ पिशवी
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम
३) वैयक्तिक औषधे
४) पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट
५) २ लिटर पाण्याची बाटली
६) मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी

{टिप: रोपवे चा खर्च स्वत:चा स्वत: करणे ( जावयाचे असल्यास)…}

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे तसेच गड व परिसरात कोणतेही असभ्य वर्तन वा कचरा करू नये.

टीप:-वरील कार्यक्रमात पाऊस वा अन्य कारणास्तव काही बदल होवू शकतो.
व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

नितीन पाटोळे
86558 23748
अजित राणे
97683 89189

सचिन जगताप (पुणे)
9890662885
प्रदीप पाटील (पुणे)
9404137023

Leave a Reply