Home >> Dediacted to all the आजोबा गड group member

Dediacted to all the आजोबा गड group member

Thursday, June 13th, 2013 | mumbaihikers | Uncategorized

मित्रांनो आपल्या आजोबा गडाच्या ट्रेकवर मी एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कविता लिहीत असताना मी आजोबा गडाला फक्त एक गड न मानता एक खराखुरा जीवंत माणूस मानून काही कडवी लिहिलेली आहेत, त्याचप्रमाणे आपण निघतानाच्या वेळेस आलेल्या पावसाला मी अश्रूंची उपमा दिलेली आहे, तर वाचकांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन ही कविता वाचावी अशी विनंती.

भ्रमंती 365 च्या गीतांजली-अमेयने
घडवून आणला आजोबागडाचा ट्रेक,
माणसं भेटली काही ओळखीची, काही अनोळखी
पण सगळी लाखमोलाची आणि एकापेक्षा एक…

पाऊल ठेवले देहणे गावात तेव्हा
पावसाळी ढगांनी सूर्याला झाकले होते,
असा वाटलं पाहून गडाकडे की
आजोबा आजीच्या गोड आठवणीत रमले होते,
पण दिसताक्षणीच आम्ही ते सर्वांना
आलिंगण देण्यासाठी धावले होते,
वयोमाननुसार जरी नव्हते त्यांना दिसत
तरी आजोबांनी मुके घेतले सर्वांचे
पटापट सर्वांनाच आपलेसे करत…

सक्ख्या आजोबांच्या कुशीत झोपायचे
मला कधी लाभले नाही सुख,
मला वाटतं ह्या आजोबा गडाने
त्याच्या कुशीत घेतलं असावं मला
ओळखून हीच माझी आजोबांच्या मायेची भूक..

गीतांजली तुझा आवाज खरच आहे खूपच
सुमधुर आणि छान,
सुरांचे सुद्धा आहे तुला बर्‍यापैकी भान,
शनिवारच्या त्या मैफिलीत तुझ्या आणि sri च्या गाण्याने
आणि haunted किस्स्यांनीच आणली खरी जान…

रात्री मस्त फक्कड जमवून आणला होता
वरण-भाताचा बेत,
घरच्या आईच्या सुगरण जेवणाची आठवण
करून देणारा थेट…

सकाळचे आजोबागडाचे रूप मनी खरोखरच भावले,
असच म्हणावं लागेल की
ट्रेक 100% achieve करवून घेण्यासाठी स्वतः
वाल्मिकी रुशीच धावले…

निघावेसे वाटत नसले तरी पाय मात्र आमचे
घरच्या वाटेकडे पडत होते,
आजोबा मात्र आमच्या वळलेल्या पाठमोर्‍या आकृत्यांकडे बघून
एकसारखे रडत होते,
मग पुन्हा केव्हा परताल नातवंडांनो आपल्या या आज्याकडे
अशी एकसारखी विचारणा करत होते……..

By
Prathmesh Tanawade
http://www.facebook.com/groups/bhramanti365/

0 thoughts on “Dediacted to all the आजोबा गड group member”

Leave a Reply