Arun Sawant Sahyadri Trekking Experience 1974

I started my mountaineering from Lala Lajpatrai College from 1974.
 Lohagad was my first trek in July 1974 of which no photographs are available.
My second trek was Kulangad, Madangad, Alangad & Ratangad in December 1974.
Those days no road was built to Kaluste or Ambewadi.
We had no alternative and had to walk 14 km from Igatpuri to Kurangwadi. Sacks were not easily available. We used to use Cotton School Bags, Shabnam, Picnic bags etc for trekking.
Had only heard about Sleeping Bags, but never seen them.
During those days air tight mineral water bottles were also not in picture, while we only used leaking school water bottles.
Hunters, canvas shoes or slippers were enough for us.
That trek proved to be exhaustive but we enjoyed to the fullest.

माझे गिर्यारोहण १९७४ सालापासून लाल लजपत राय कॉलेज मधून सुरु झाले. पहिला ट्रेक जुलै १९७४ ला लोहगड चा केला. त्यावेळी कोणाकडेच कॅमेरा नव्हता. कॅमेरा केवळ श्रीमंतान्कडेच पाहायला मिळायचा. दुसरा ट्रेक डिसेंबरात केला तो खूपच खडतर होता. कुलंगगड, मदनगड, अलंगड व रतनगड. त्यावेळी आजच्यासारखा काळूस्ते वा आंबेवाडी पर्यंतचा रस्ता नव्हता. आम्ही थेट इगतपुरी पासून कुलंगवाडीपर्यंत १४ किमी चालतच जायचो. चांगलेच हाल व्हायचे. नंतर कुलंगगडावर चढून त्या रात्रीचा मुक्काम. दुसरे दिवशी मदन गडावर मुक्काम. तिसरे दिवशी अलंग गड व चौथे दिवशी रतनगडावर मुक्काम. पाचवे दिवशी घरी परत. त्या ट्रेकला नशिबाने आमच्यातील एकाकडे कॅमेरा नावाची चैनीची वस्तू होती. त्यामुळे संग्रही फोटो ठेवता आले. त्या काळी Sack सहज उपलब्ध नव्हती. अन परवडणारीही नव्हती. शाळेचे दप्तर, शबनम, खांद्याला लावायची पिकनिकची ब्याग आदी उपलब्ध वस्तूंचाच वापर व्हायचा. फोटो मध्ये तुम्हाला अशा वस्तू दिसतील. Sack नाही म्हणून आमचे कधीच अडले नाही. विशेष म्हणजे त्या काळी मिनरल वॉटरच्या हवाबंद बाटलीचा शोध लागला नव्हता. शाळेत वापरायची बुचाच्या कडेने गळणारी waterbottle वापरायचो. हंटर, canvas चे बूट अथवा स्लीपरवर भागायचे. स्लीपिंग ब्याग ऐकीवात होती व फोटोमध्येच बघितली होती. डिसेंबरात वरील किल्ल्यांवर खूप थंडी असते एवढीही माहिती नव्हती. त्यामुळे वरील ट्रेकला आम्ही साधी चादरच नेली होती. हाल झाले पण खरोखच मजा आली.

http://www.facebook.com/arunpsawant

Leave a Reply