Home >> गिरीदर्शन तर्फे कोकणकडा प्रस्तरारोहण

गिरीदर्शन तर्फे कोकणकडा प्रस्तरारोहण

Sunday, November 30th, 2014 | Pane Harker | Uncategorized
गिरीदर्शन तर्फे कोकणकडा प्रस्तरारोहण
गिरीदर्शन या पुण्यातील अग्रगण्य संस्थेबरोबर आपण अनेक पदभ्रमण कार्यक्रम
केले असतील, कदाचित आपण आमच्याबरोबर आपल्या पदभ्रमणाच्या छंदाची सुरवात पण केली असेल, आज पर्यंत असंख्य दुर्गा प्रेमीना, इतिहास प्रेमीना पदभ्रमणाचा अत्युच्च आनंद देणाऱ्या आपल्या गिरीदर्शन ने दिनांक २५ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावर कातळारोहण ( Rock climbing) मोहीम आयोजिलेली आहे,
सदर मोहिमेत पुण्यातील अनुभवी असे ६ आरोहक भाग घेणार आहेत. या मोहिमेद्वारा हौशी ट्रेकर्स पर्यंत कातळारोहणाचा छद पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे,
सदर मोहिमेत आपण बेसकॅम्पला भेट देऊन १८०० फुटाचे कातळारोहण पाहू शकता,
सदर मोहिमेचा एकूण खर्च ३ लाखाच्या आसपास आहे, पण आम्ही इतर संस्था आणि अनुभवी आरोहाकांच्या कडून बरेच साहित्य वापरण्यास घेऊन खर्च 1.5 लाखापर्यंत कमी केला आहे,
आज पर्यंत आपल्याला भटकंतीचा अनोखा आनंद देणाऱ्या आपल्या लाडक्या गिरीदर्शनया संस्थेला आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे
आपल्याला सर्व खर्चाचा तपशील आमच्याकडे पाहण्यास मिळेल, एवढा खर्च का आहे ते तपासून पाहता येईल,
आपण या कामी संस्थेस सढळ हाताने मदत करावी या साठी आम्ही आवाहन करीत आहोत.
आपण रु ५०० पासून कितीही मदत संस्थेला देऊ शकता, किंवा सरळ संस्थेच्या बँक खात्यात जमा करू शकता,
आज पर्यंत आपल्याबरोबर हजारो भटक्यांनी आनंद उपभोगला, आता या संस्थेला मदत करण्याची वेळ आली आहे
अधिक माहिती करिता ९८५०५२००५८ वर संपर्क करा
आपला
सतीश मराठे

Leave a Reply