“श्री शिवराजाभिषेक सोहळा” किल्ले रायगड येथील काही क्षणचित्रे असलेला हा छोटासा प्रोमो

“श्री शिवराजाभिषेक सोहळा” किल्ले रायगड येथील काही क्षणचित्रे असलेला हा छोटासा प्रोमो आपणा शिवभक्तांच्या समोर सादर करीत आहोत. संकल्पना,संकलन,कॅमेरा,दिग्दर्शन – अमोल वसंत घाग, निवेदन – तुषार पवार, ग्राफिक्स- आशिष इस्वलकर
विशेष आभार: रंजन गावडे, समीर वारेकर, अमित जठार
महाराष्ट्राचा एकमेव सुवर्णदिन म्हणून ओळखला जाणारा आपल्या लाडक्या महाराजांचा ” श्री शिव राजाभिषेक सोहळा ” सालाबादप्रमाणे तिथीनुसार ” १८ जून २०१६ रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले दुर्गराज रायगडावर जल्लोषात संपन्न होणार आहे. आपण खूप भाग्यवान आहोत कि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला हा देवदुर्लभ सोहळा अनुभवण्यास मिळतो आहे. तरी हि आपण सर्वांनी या पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाचा अनुभव घेण्यास तीथीनुसार होणाऱ्या या सोहळ्यास हजर राहावे, शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी कामी आलेल्या सर्व शूर मावळ्यांना माझा आणि “तांबावाला बिल्डिंग आरती अभिषेक मंडळा” तर्फे आमचा मानाचा मुजरा !!!!!!!!! II जय भवानी जय शिवाजी II II जय महाराष्ट्र II
तख्त मांडिले सामर्थ्याचे,
शिवरायांनी शककर्त्याचे,
रामच कर्ता, रामच भोक्ता,
श्री शिवछत्रपती झाले
निमंत्रक : “श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव समिती”

Leave a Reply