Home >> Shivrajyabhishek Sohala 2016 || शिवराज्याभिषेक सोहळा २०१६ ||

Shivrajyabhishek Sohala 2016 || शिवराज्याभिषेक सोहळा २०१६ ||

Friday, March 24th, 2017 | mumbai hiker | Raigad

॥ श्री शिवराज्याभिषेक सोहळा ॥

मोत्यांची झालर लावलेलं , रत्नजडीत राजछत्र गागाभट्टांनी हातात घेतलं व महाराजांच्या मस्तकावर धरलें !
आणि गागाभट्टांनी उच्च स्वरांत घोषणा केली….. महाराज श्री शिवाजीराजे आज छत्रपती झाले ! छत्रपती ! राजा श्री
शिवछत्रपती ! क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा श्री शिवछत्रपती की जय ! जय ! जय !
त्या जयजयकाराने दिल्लीच्या कानठळ्या बसल्या ! विजापूर बधीर झालें ! फिरंग्यांची झोप उडाली ! रुमशामपावेतो दख्खनच्या दौलतीच्या नौबती ऐकूं गेल्या . राजसभा देहभान विसरली होती .
कोणत्या शब्दांत सांगूं हें सारें ?
आनंदनाम संवत्सरे , शालिवाहन शके १५९६,
जेष्ठ शुद्ध १३ , शनिवारी , उषकाली पांच वाजतां महाराज श्री शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले !
चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतांनाही त्यांस पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला !
सामान्य गोष्ट नव्हे !
सुलतानांची मिरास संपली .
देवगिरी , वारंगले , द्वारसमुद्र , कर्णावती , विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेलीं सिंहासने आज रायगडावर सांधली गेलीं .

सर्व शिवभक्तांनी या मंगलमयी दिनी अर्थात
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९३८, शनिवार दि .१८ जून २०१६ रोजी

श्री शिवराज्याभिषेक सोहळा
म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मनाचा हिन्दवी स्वातंत्र दिन !

Leave a Reply