Raigad Rajyabhishek Sohla

सोहळा ऐसा होणार रायगडी निनादणार त्रिवार मंगल चौघडी असेल साक्षीला तो रायरेश्वर होणार माझा राजा सिंहासनाधिश्वर होणार चक्रवर्ती सम्राट आमचं धनी हीच आस.. हाच ध्यास मनी एकच नाद नजर जाईल जिथवर होणार माझा राजा सिंहासनाधिश्वर पाहील हा सोहळा तो प्रचंड बुलंद सह्याद्रि स्वतः स्वरूपी हजर असेन तो शंभू कैलाशपती वैभव ऐसे ते पाहून लाजेल तो लंकेश्वर होणार माझा राजा सिंहसनाधिश्वर रायगडीची माती लावता माथी होईल धन्य हा देह नश्वर एकचं आता ध्यास तना – मनावर होणार माझा राजा सिंहासनाधिश्वर रायगडी होईल साकार निष्ठेचं सिंहासन होणार विराजित त्यावरी शिवराजेशवर भूपति, हयपती, गडपती होणार माझा ईश्वर होणार माझा राजा सिंहासनाधिश्वर…!!! होणार माझा राजा सिंहासनाधिश्वर…!!!

Leave a Reply