Lohagad Trek 16 july Join 360 explorers | लोहगड ट्रेक १६ जुलै ३६० एक्सप्लोरर सोबत येऊ शकता

#का_ट्रेकींग_करतो????

_डोंगरमाथ्यावर एकटे असता, वारा असतो, आभाळ भरून आलेलं असतं, डोळे मिटतात, वारा केसातून कानावरून जात असतो, कार्गो फडफड वाजतं असते, या निसर्गाचा आपण एक भाग आहोत असं नव्याने उमगू लागतं. मानव काहीतरी वेगळा हा आत्मविश्वास गळून पडतो. तो आजही दमतो, तो आजही पाण्यापाई तहानेने व्याकूळ होतो, त्याला आजही शारिरिक श्रम केल्यावर सपाटून भूक लागते, हिरवागार निसर्ग बघितल्यावर तो आजही प्रफुल्लित होतो, किड्यामुंगीत रमतो. मानवाने निसर्गाला आपलंसं केलं की नाही हा भाग अलाहिदा पण निसर्गाने माणसाला अजूनतरी पूर्णपणे दूर नक्कीच लोटलेलं नाही. पण निसर्ग डोळेझाक कुठवर करेल? अजून किती वेळ डोळे बंद ठेवून असं उभं रहायचं. आभाळ भरून येतं वारा हळवा होतो पान मुसमुसतात .. एक थेंब गालावर .. दुसरा कपाळावर त्यापाठोपाठ तिसरा पापणीखाली … संततधार. समोरच्या बेफिकीर डोंगररांगा .. धुरकट सरींच्या पडद्याआडचं पर्दानशीं जग. दरीतल्या झाडाच्या पानांना शेंड्याला अवेगाने बिलगणारा पाऊस. निथळता निसर्ग. कानाच्या पाळीवरून एक थेंब उतरून मानेवरून ओघळत टिशर्टच्या राउंड कॉलरमध्ये विरतो. अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या हा ट्रेक शेवटचा असं म्हणू देत नाहीत. जसं की दमण्याचा अनुभव. तुम्ही शेवटचं स्वत:च स्वत:चं स्वत:शी आजूबाजूला लक्ष न देता कधी बोललात? स्वत:चे श्वास कधी ऐकलेत? दिवसभराच्या कोलाहलात स्वत:शी संवाद साधायला बर्‍याचदा वेळच मिळत नाही.पण ट्रेक्रींगला शेवटच्या टप्प्यात घामाने ओथंबलेले दमलेले असता तेव्हा स्वत:चे श्वास स्वत:ला ऐकायला येतात. स्वत:ला नव्याने आजमावतो नव्याने ओळखतो आपण स्वला बस इकेच

360 Explorers- Fly High

LOHAGAD FORT TREK

Rs.499/-

(Insurance & Including Everything)

    16th July 2017 

            With

Everest Climber Anand Bansode

Contact-
9960126860

360 एक्स्प्लोरर

लोहगड फोर्ट ट्रेक 

रु. 499/-

(इन्शुरन्स सहित सर्व खर्च)

१६ जुलै २०१७ रोजी 

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोबत

संपर्क-
9960126860

Leave a Reply