NIGHT TREK TO KALSUBAI -MAHARASHTRA HIGHEST PEAK

Kalsubai Peak is the Highest Peak of the Sahyadris (1646M) in the Akole Taluka of Ahmednagar District of Maharashtra. Kalsubai Temple is Located at the Topmost peak of Sahyadri Mountain Range Of Maharashtra.

कळसुबाई- महाराष्ट्रातील सह्याद्री रांगेतील सर्वात उंच शिखर खूप दिवसापासून येथे जान्याची इच्छा होती. ती या गेल्या शनिवारी २०१६ च्या अखेरी पूर्ण झाली. शाळेमध्ये असताना हे नाव खूप वेळा डोळ्याखालून गेले होते
आणि आज जेव्हा कळसुबाई शिखराला भेट दिली हे डोळे आनंदाने येथील निसर्गाचा आस्वाद घेऊ लागले.
शनिवारी रात्री आम्ही आमच्या बरोबर दत्तू नावाच्या वाटाड्याला बरोबर घेऊन शिखर सुमारे २:३० वाजता चढण्यास सुरवात केली आणि पहाटे ५:३० वाजता अखेर शिखराच्या टोकावर पोहचलो येथील कळसूबाईचे लहानच पण मन प्रस्सन करणारे मंदिर पहिले व आनंद गगनात मावेनासा झाला. दर्शन होत असतानाच सूर्यदेवाचे हि आगमन होताना दिसू लागेल आणि हा क्षण खूप दिवसांनी अनुभवायला मिळत होता शहराकडे हा कवचीत च अनुभवायला मिळतो. केशरी पिवळ्या रंगाची उधळण सारीकडे होत होती आणि या रंगामध्ये नाहून निघालेली सह्याद्री पर्वतरांग खूप विलोभनीय दिसत होती.
कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी या गावात दुपारी मेजवानी केली. हॉटेल ट्रेक कळसुबाई येथील खडे खाणावळी त जेवण्याची सोय केली होती. माफक दारात शाकाहारी व मांसाहारी जेवण उपलब्ध करून त्यांनी आमच्या पोटाला खुश केले.आम्ही हि जातीने खव्वये आणि अश्या मध्ये जर जेवण रुचकर मिळाले तर मग मज्जा वेगळीच……
परतीचा प्रवास करतं असताना तेथे कैद केलेल्या आठवणी काही मनात तर काही कॅमेऱ्यामध्ये जतन करून ठेवल्या आणि याच आठवणी पुढील आयुष्यात कधीतरी चेहर्यावर स्मित हास्य आनतीलाच………..

जर तुम्ही हि या स्थळाला भेट देऊ इच्छित असाल तर रात्रीचा पर्याय खूप मस्त आहे …..
I created this video with the YouTube Video Editor (http://www.youtube.com/editor)

Leave a Reply