Rajmachi Fort 01 – किल्ले श्रीवर्धन

या गडाच्या पोटात ठिकठिकाणी खोदलेली शैलगृहे, पाण्याच्या टाक्या आणि मुख्य म्हणजे या गडाशेजारीच असलेली कोंडाणे लेणी या साऱ्या खाणाखुणा या गडाला प्राचीन काळापर्यंत घेऊन जातात. कल्याण, नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती आणि या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा पुरातन व्यापारी मार्ग. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी, शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे ‘ किल्ले राजमाची. ..हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा निर्मिला असावा. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असे गड नजरेस पडतात . त्यामळे भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला म्हणजे लष्कराचे एक प्रमुख ठाणं असले पाहिजे.

Leave a Reply