कोथळीगड I पेठ चा किल्ला I सह्याद्री भटकंती – kothaligad – Peth Fort Trek – Explore Sahyadri

कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे.या किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते.पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्‍यांचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.

Peth, also known as ‘Kothaligad’, is situated in Shahapur Taluka, approximately 21Km North East of Karjat.Kothaligad is more commonly known as the fort of Peth because the village of Peth is situated at its base.The pinnacle of the Peth can be seen from the village. It looks like a filed surface. On reaching the top of the fort, we see caves carved in huge rocks. The first one is the cave of Goddess and the last one is the specious Bhairoba cave. A flat floor and well-sculpted pillars are specialty of the cave. Along the Bhairoba cave, steps are carved leading the pinnacle and some canon balls are scattered in the fort.

Leave a Reply