सोनोरी किल्ला-मल्हारगड | Sonori Fort-MalharGad

पुण्याहून अवघ्या ३० किलोमीटरवर, दिवेघाट ओलांडला की डावीकडे सोनोरी गावात वळायचे. ४ ते ५ किलोमीटरवर उजव्या हाताला एक मोठा दरवाजा दिसतो. या परिसरात ज्यांनी मल्हारगड बांधला त्या पानसे सरदारांच्या वाड्याचे तेथे अवशेष आहेत. गडाच्या पायथ्यापर्यंत चार चाकी गाडीही आरामात जाऊ शकते. गडाच्या पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास फारतर ४५ मिनिटे लागतात. गडावर खंडोबा आणि महादेवाची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. गडाचा पसारा फार मोठा नाही, १५-२० मिनिटांत सगळा गड पाहून होतो.
दिवेघाटावर टेहाळणी करण्यासाठी पेशव्यांच्या कारकिर्दीत हा गड बांधला गेला. गडाची तटबंदी अद्याप शाबूत आहे . आत १-२ पडक्या अन कोरड्या विहरी आणि आतल्या लहान किल्ल्याचे काही अवशेष सोडले, तर गडावर मोठे असे बांधकाम नाही. गडाचे बुरुज आणि तटबंदी राजगड किंवा सिंहगडासारख्या मोठ्या आकाराचे नाहीत. गडावरून लोणी परिसर, सासवड परिसर दूरवर पसरलेला दिसतो.
Malhargad is a hill fort in western India near Saswad, 30 kilometres (19 mi) from Pune. It is also known as Sonori Fort due to the village of Sonori being situated at its base. The fort was named for the godMalhari and was the last fort built by the Marathas, about 1775.

आपल्याला व्हिडीओ आवडल्यास जरूर खाली कॉमेंट करा आणि लाईक करा. Please Like and Comments

SUBSCRIBE my channel and Watch more videos
1. Maharashtra Paradise: All About Maharashtra, Culture and Locations
https://www.youtube.com/channel/UCvWHdjO5bOXUsYQOyQOnneA

2. The Great Indians – All About Indian Leaders and Personalities
https://www.youtube.com/channel/UCTt-yipfRnXojf6d7eADX_Q

3. Saurabh Kumbhar : Best videos
https://www.youtube.com/user/saurabhkumbhar1

4. S.K. Computers: All about Computer in Marathi
https://www.youtube.com/channel/UCmoL45DvvRnBmOMWtF0e9Sw

Leave a Reply