टकमक किल्ला Takmak Fort

टकमक किल्ला
मुंबई अहमदाबाद मार्गावर टोल नाका सोडला कि समोरच टकमक डोंगररांग दिसते, हि डोंगररांग शिरसाड ते मनोर यांच्यामध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर टकमक किल्ला आहे.
या टकमक किल्ल्याच्या पायथ्याशीपूर्वेकडे सकवार गाव तर उत्तरेकडे गांजे गाव आहे.
सकवार गावातून ३ तास मध्ये टाकमार्कच्या दक्षिणेकडील खिंडीने गडावर पोहोचता येत.
गडावर दक्शिण टोक कडे असलेल्या खुट्टा बाजूने तटबंधी पाहत प्रवेश होतो. या टोकावर भगवा झेंडा आहे.
पुढे गेलो कि पाण्याची जोड टाकी आहेत, असे पुरातन ऐकू १३ टाकी गडावर आहेत पण ती गडाच्या उत्तर दक्षिण बाजूस आहेत.लहानशी गुहा हि पाहावयास मिळते. गड पूर्ण पाहायला १ तास लागतो.
गडावरून वैतरणा नदीचे छान दृश्य पाहावयास मिळते.
दुर्लक्षित राहिल्यामुळे अनेक अवशेष हे अज्ञात आहेत. वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत इतिहासकार यांनी अनेक संवर्धन मोहिमा राबवून किल्ल्याचे खूप गुपिते समोर आणली आहेत. गडावरील पाण्याची टाकी, मंदिर हे पाहण्यासाठी मिळतात ते फक्त राऊत सरांच्या मेहनतीमुळेच.

Leave a Reply