Karnala fort कर्नाळा किल्ला

Karnala fort कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला
मुंबईपासून ६२ कि.मी. वर व पनवेलपासून १३ कि.मी. वर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल आहे. त्यात अनेक प्रकारचे पक्षी दिसतात.
इथे पक्षी अभयारण्य आहे. १५० हून अधिक जातींचे पक्षी इथे आढळतात. सतत हिरवे जंगल हे इथले वैशिष्ट्य.
किल्ल्यावर ५० मीटर उंचीचा उत्तुंग कावळकडा आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
मुंबई- गोवा मार्गाने : मुंबई- गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेच पुढे कर्नाळ्याचा परिसर लागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एस.टी येथे थांबते. समोरच असणाऱ्या हॉटेल जवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाटा चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास लागतात.

Leave a Reply