Riwa Fort (रिवा किल्ला)

Riwa Fort (रिवा किल्ला)
मुंबई मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरुन पूर्वेकडील डाव्या हाताच्या फुटपाथने चालत गेल्यावर २ मिनिटात आपण शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ पोहोचतो.
ह्या महाविद्यालयाच्या परिसरात टेकडीच्या उतारावर आयुर्वेदिक वनस्पतींची बाग केलेली आहे. ह्या बागेतच रिवा किल्ल्याचा साक्षीदार असलेला एकमेव बुरुज उभा आहे. पावसाळ्यात बुरुज पूर्ण झाडी व गवताने भरून जातो तर दिसणे अवघड होते. उन्हाळा मध्ये पडत चाललेला बुरुज पाहता येतो.

इ.स. १६७२ साली जंजिर्‍याच्या सिध्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नविन किल्ले बांधले त्यात सायनच्या टेकडीवर असणार्‍या रिवा किल्ल्याचा समावेश होतो. माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरे कडून होणार्‍या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.

Leave a Reply