Sion Fort सायन/शीवचा किल्ला

सायन/शीवचा किल्ला
मुंबई पुणे महामार्गावर सायन म्हणजेच शीव मध्ये रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या टेकडीवर सायनचा/शीवचा किल्ला आहे.
माहीमच्या खाडीमुळे मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून व साष्टी बेटांपासून वेगळी झाली होती. त्या काळात माहीमच्या खाडीतून व्यापार चालत असे. तसेच साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यामुळे माहीमच्या खाडीतून चालणार्‍या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरे कडून होणार्‍या पोर्तुगिज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड ऑगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.
इतिहासात किल्ल्यासंदर्भात महत्वाची घटना घडावी नसली तरीही इंग्रजांच्या दृष्टीने शीवचा किल्ला हे एक महत्वाचे लष्करी ठाणे होते.
किल्ल्याच्या पायथ्याच्या उतारावर सध्या महानगरपालिकेने बगीचा (नेहरू उद्यान) केला आहे.
पुरातत्व खात्याचे कार्यालय बाजूलाच आहे, पायर्यांनी गड चढायला सुरवात केली कि बगीचामध्ये गडाच्या पायऱ्यांवर व कुंपणावर बसलेले बाजूच्या कॉलेज चे प्रेमवीर/वीरांगना एकमेकांना चिकटून अभ्यासा/प्रेम चे गीत गाताना दिसतात.
मोठ्या पायऱ्या चढत आपण किल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो, माथ्यावर जुन्या किल्ल्याची इमारत अजूनही तग धरून आहे. किल्ल्यावर तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत.
किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या खाडीपर्यन्त पसरलेल्या शहराचे दृश्य दिसते.

Leave a Reply