Worli Fort वरळी किल्ला

वरळी किल्ला
माहीम खाडीच्या दक्षिणेच्या टोकावर वरळीचा किल्ला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला वस्ती असून समुद्र बाजूला कोस्ट गार्ड ऑफिस आहे.
चौकोनी आकाराच्या या किल्ल्याला पायऱ्या व मजबूत असं प्रवेशद्वार आहे. पुरातत्व खात्याने किल्ल्यावर काम केले असल्यामुळे किल्ला हा सिमेंट याने सुस्थितीत आहे.किल्ल्यावर घंटा बांधायला छोटा टॉवर, पाण्याची विहीर,हनुमानाचे छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे.किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात.
तटबंधी वरून उत्तरेकडे वांद्रे तर दक्षिणेकडे मलबार हिल पर्यंतचा परिसर दिसतो तसेच अलीकडील वरळी-वांद्रे सागरी पुल पाहाता येतो. वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी ‘यू‘ या अक्षरा सारखा आकार तयार होतो.
मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर इंग्रजांनी १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला. ह्या किल्ल्याचा उपयोग जलवहातूकीवर नियंत्रण, समुद्रीमार्गाने होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला.

Leave a Reply