अर्नाळा किल्ला Arnala fort

विरार स्थानकापासून ९ किमी अंतरावर वसलेले छोटास गाव म्हणजे #अर्नाळा. #विरार स्थानकावरून एसटीने, महापालिकेच्या बसने वा रिक्षाने अर्नाळ्यापर्यंत जाता येते.
पर्यटकांना आकर्षित करणारा हा किनारा वन डे पिकनिक साठी अत्यंत योग्य आहे
#मुंबई आणि #वसई येथील लोकांची गर्दी असलेले प्रसिद्ध किनारा. पोहण्यासाठी हा किनारा पोहण्यासाठी स्वच्छ नाही.
याच अर्नाळा नावाच्या छोटया बेटावर बांधलेला #जलदुर्ग म्हणजेच किल्ले जंजिरे अर्नाळा.
किल्ला समुद्रात असल्याने बोटीने जाव लागत. बोट सतत चालू असतात.

चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली.
१७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठयांच्या ताब्यात आला.
पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली.
१८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून, तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

‘बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!’

या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत.

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानीमातेची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्याआहेत. तळ्यातले पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी, तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार मुख्यत: कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

#Arnala fort #अर्नाळा_किल्ला #Trekkers_Journey

Leave a Reply