मराठी भाषा पंधरवडा: १ जानेवारी ते १५ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनाने घोषित केला आहे.
यंदाचा भाषा पंधरवडा कसा साजरा करायचा ?
फक्त चर्चा , वादविवाद यांच्या पलिकडे जाऊन काहीतरी करायचंय ?
असं काहीतरी जे तुम्ही घरबसल्या सहज करु शकता.रोज फक्त पंधरा मिनिटे योगदान देऊन आपण बदल घडवू शकतो.पंधराव्या दिवशी आपण काहीतरी ठोस केलंय,संवर्धनाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट संवर्धन केलंय – हे समाधान हवं असेल तर सज्ज व्हा गुगल भाषांतर दिंडीसाठी.
हे नक्की काय आहे ?
– गुगल भाषांतर दिंडी हा एक ऑनलाईन उपक्रम आहे. गुगल ट्रानस्लेटची मराठी भाषांतर सुविधा अधिकाधिक सक्षम व्हावी. भाषांतरे अचूक व्हावीत यासाठी जनसहभाग घेण्यात येणार आहोत.
पंधरा दिवसांत “एक लाख योगदाने “_ मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.
कधी आहे गुगल भाषांतर दिंडी ? .
– दिंडी मराठी भाषा पंधरवड्याचा मुहुर्त साधून नव्या वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१८ रोजी सर्व समाज माध्यमांचा वापर करत भरणार आहे.
दिंडीचे आयोजक कोण आहेत ?
दिंडीचे आयोजन ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान, @Marathiword आणि @Marathirt ह्या ट्विटरवरील खात्यांनी केलं आहे.
मी कसा सहभाग घेऊ ?
– तुम्ही स्वतः गुगल ट्रान्सलेट वर भाषांतर किंवा प्रामाणीकरणे करून सहभाग नोंदवू शकता.
– भाषांतर तुम्ही Crowdsource हे अॅप वापरून किंवा https://translate.google.com/community#en/mr या दुव्यावरून करू शकता.
– भाषांतर केलं की त्या बद्दल चा डेटा तुम्हाला खालील गुगल फॉर्मवर भरायचा आहे. हा फॉर्म अर्ध्या मिनिटात भरून होतो.
दुवा : https://goo.gl/forms/XHkiZUUox0fy6arN2.
-हा फॉर्म तुम्ही रोज किंवा तुमच्या सवडीने १५ जाने. पर्यंत कधीही भरू शकता.फक्त एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरताना इमेल आयडी मात्र सारखाच भरावा.