“निसर्ग संवर्धन” संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली) मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी

महाशिवरात्री उत्सव निम्मित “निसर्ग संवर्धन” वर्ष ३४ वे

‘दि नेचर लव्हर्स, “साहस हा पाया व निसर्ग संवर्धन हे ध्येय” आयोजित
महाशिवरात्री उत्सव निमित्त “निसर्ग संवर्धन”
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली)
मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता

संपर्क :
एनएल. राजन बागवे ९८२००७२१४३
एनएल. कक्षा खांडेकर ९८६९५३०१३१

“साहस हा पाया व निसर्ग संवर्धन हे ध्येय” हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘दि नेचर लव्हर्स, मालाड’ हि आपली संस्था गेली ४३ वर्षे गिर्यारोहण आणि निसर्गसंवर्धनाच्या क्षेत्रांत कार्यरत आहे.

“निसर्ग संवर्धन” या आपल्या संस्थेच्या ध्येयाखाली सामाजिक बांधिलकी ठेवून गेली अनेक वर्षे महाशिवरात्री उत्सव दिवशी बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे निसर्ग संवर्धनाच्या कार्याला हात भार लावत आहोत.

महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने निसर्ग संवर्धनाची जाणीव देवून त्यांना प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या याच्या वापरापासून परावृत्त करणे तसेच जंगलाला वणवा लागण्याचा धोका ओळखून त्यांच्याकडील आगपेटी, सिगारेट लायटर, ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात येतात. हा सर्व उपक्रम आटोक्यात आणण्यासाठी स्वंयसेवकाची आवश्यकता असते. हा उपक्रम सामाजिक उपक्रम तसेच आपली जबाबदारी असून जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सामील होवून निसर्ग संवर्धन यशस्वी होण्यास हात भार लावावा. हि विनंती !

आनंद निसर्ग जपण्याचा,
आनंद संवर्धन उभारण्याचा,
आनंद निसर्ग संवर्धनसाठी केलेल्या श्रमदानाचा,
आनंद या मातृभूमीसाठी केलेल्या या कार्याचा…!

तर मग तयार व्हा….

हातून सत्कार्य घडण्यासाठी… एकसंधी मिळतेय… निसर्ग संवर्धनात सहभागी होण्याची…
आज “दि नेचर लव्हर्स” स्वमेहनतीने “निसर्गसंपत्ती” वाचवण्याचा प्रयत्न करतेय…

येत्या मंगळवारी दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता बोरीवली येथील
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे निसर्ग संवर्धन एक समाजकार्य करायला निघालीय.

तसेच निसर्ग संवर्धनात सहभागी होण्यासाठी व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी
आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Regards
एनएल. विनोद पाटील
फिल्ड इन्चार्ज ९८९२६५८४७५
दि नेचर लव्हर्स
(“साहस हा पाया व निसर्ग संवर्धन हे ध्येय”, मालाड, मुंबई)

Leave a Reply