शिवकालीन गजेंद्रगड किल्ला कर्नाटक Gajendragad Karnatak

शिवकालीन गजेंद्रगड किल्ला कर्नाटक
गाव / तालुका : #गजेंद्रगड, जिल्हा : #गडग, प्रकार : #गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची 780 मीटर.
coordinates : 15.73°N 75.98°E
गजेंद्रगड चा अर्थ गजेंद्र- हत्ती, आकाशातून पाहता गजेंद्रगड शहर हे हत्तीसारखा आकाराचे दिसते म्हणून किल्लाचे व शहराचे नाव गजेंद्रगड. स्थानिक लोक या किल्ल्याला गडा म्हणतात. किल्ल्याला शिवाजी किल्ला असेही म्हणतात. कारण हा किल्ला #छत्रपती_शिवाजी_महाराजांनी बांधला.
गजेंद्रगड एका उंच व वर पसरलेल्या डोंगरावर हा किल्ल्ला आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
पायरीमरागने वर आलो कि सुंदर मराठेशाही धाटणीचे मोठे बुरुज व भक्कम असे गोमुख धाटणीचा सुस्थितीत प्रवेशद्वार स्वागत करतात.
बुरुजांवर दिवड्या, दरवाजावर शरभ, शिलालेख, नागशिल्प, घोडेस्वार चित्र कोरलेले दिसून येतात.
बुरुजांच्या मधोमध सज्जा आहे, तिथे वर पायरीमार्गाने जात येत. गजेंद्रगडाच पूर्ण दर्शन येथून होत.
बुरुज व पुढे इमारतींचे अवशेष व त्यामागे एक प्रचंड मोठा बांधीव तलाव हौद, त्यावर बांधीव मोठा नंदी, हत्ती शिल्प आहेत.
हा डोंगर वर सपाट असल्याने किल्ला दूरवर पसरलेला आहे, तसेच किल्ल्याचे सर्व डोंगरावर अवशेष आहेत.
किल्ल्याची दूरवर तटबंदी प्रेक्षणीय आहे, अप्रतिम असे 15 ते २० बुरुज ,एक दर्गा, देवी मंदिर, 2 दीपमाळ, कोरीव 2 हौद किल्ल्यावर आहेत.
किल्ल्याच्या पायथ्याला घोरपडे यांचा जुना वाडा आहे.
@Trekkkers_Journey

Leave a Reply