इरकलगडा किल्ला कर्नाटक ಇರಕಲ್ ಗಡ Irakalgada Fort

इरकलगडा किल्ला कर्नाटक ಇರಕಲ್ ಗಡ
गाव : इरकलगडा , तालुका / जिल्हा : कोपल, प्रकार : ,गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची 658 मीटर.
Coordinates: 15°28′2″N 76°13′15″E
कोपल या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणापासून १२ किमी वर कोपल-कुश्तगी (स्टेट हायवे नं ३६) रस्त्यावर #इरकलगडा किल्ला आहे.
इरकलगडा किल्ल्याच्या बाजूला दोन गावे आहेत, डावीकडे इरकलगडा गाव तर उजवीकडे यालामगिरा.
यालम गिरा गावातून 10 मिनिट दगडावरून चढाई करून आपण किल्ल्यावर पोहोचतो.
या गिरिदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार यालामगिरा गावच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच इरकलगडा गावभिमुख आहे..
नैसर्गिक दगडाचा पुरेपूर वापर करून बांधलेला हा अप्रतिम दुर्ग आहे,
उत्तर मुखी दरवाजा, ,2 एकर मध्ये असेल, सुसज्ज दरवाजा, बुरुज पाहण्यासारखं आहे.
प्रचंड मोठी दगडं गडात आहे, एक बांधीव टाक, एक आयताकृती टाक पाहता येत.
सुरक्षित रचना असलेला हा सैनिकी टेहळणीसाठी गड असावा असं गड पाहणीतून दिसून येत.
Trekkers Journey

Leave a Reply