दिवाळीत किल्ला का बांधावा ?? दिवाळी गड – किल्ले स्पर्धा २०१८ | गडवाट | Gadwat 🚩

दिवाळी आणि किल्ला यांचं भावनिक नातं आहे . का करायचा हा प्रश्न सहसा कुणाला पडत नाही. कसा करायचा याच्या चर्चा मात्र रात्रंदिवस झडतात. दिवाळी जशी जवळ यायला लागते तशी पोरांची लगबग वाढते. शेतातून लाल माती आणायला सायकलच्या मागे घमेली अन खुरप घेऊन प्याण्डल फिरू लागतात. किल्ल्यावर झाडी खरीच पाहिले म्हणून हरळी आणायला बालगोपाल किराणा दुकान पालथी घालतात. किल्ल्याच्या खाली एखादा तलाव, त्यामध्ये दोन चार छोटी गलबत, आधुनिकता म्हणून मधेच लावलेलं एखाद कारंज , कारंज्यासाठी गावातल्या डॉक्टर च्या दवाखान्यात सलाईन च्या बाटल्या आणि सुया (सिरींज) मिळवण्यासाठी केलेली धडपड , कित्येक दिवस आधीपासून शिवाजी आणि सैन्य आणण्यासाठी घरच्यांकडे लावलेला तगादा , राजा कुठं बसणार आणि सैन्य कुठं असणार याच केलेलं प्लॅंनिंग , किल्ल्यावर एखादी गुहा आणि त्यामधून बाहेर पडणारा वाघ दाखवण्यासाठी केलेली जुळणी , किल्ल्याची तटबंदी रंगवण्यासाठी शाळेच्या चित्रकलेच्या रंगांचा केलेला सर्वनाश ;), आयुष्यात कधी किल्ला पहिला नसला तरी किल्ल्याच्या पायऱ्या अशाच असाव्यात अशी मनात असलेली भावना , दिवाळीत त्या किल्ल्यामुळे उजळलेले आमचे चेहरे आणि मन, राजा आणि सैनिक किल्ल्यावर पाहून माहित नसलेला राजा असा असावा या विचाराने अंगावर आलेला काटा, दिवाळी संपत आली की सून सून वाटणार घराचं आंगण….

लेखन – अनिकेत वाघ
आवाज – निलांबरी अनगळ
छायाचित्रण – गडवाट – https://instagram.com/gadwat_official?utm_source=ig_profile_share&igshid=1dydrg6yj6epc
संकलन – विशाल सीताराम गवळी – https://instagram.com/artistontwowheels?utm_source=ig_profile_share&igshid=s8h11v8t9mim

Leave a Reply