Information for new trekkers, seasoned wanders

नुकतच हरिच्छंद्र गडाच्या कोकणकडा परिसरात  वेळेचं नियोजन चुकल्यामुळे  काही डोंगरप्रेमीना अंधारात रात्र काढावी लागली.अशी वेळ येऊ नये व आलीच तर काय करावे या साठी काही मुद्दे नमूद करू इच्छितो.**ही माहिती नवागतांसाठी आहे, अनुभवी भटक्यांनी त्यात अधिक भर घालून अननुभवी निसर्गप्रेमींपर्यंत पोहचवावी.**
१, कितीही लहान व सोपा ट्रेक असला तरी आपल्या सॅक मध्ये टॉर्च, एक कपड्यांचा जोड, थोडं खाणं व पाण्याच्या २ बाटल्या सोबत ठेवाव्यातच.२, भटकंतीच्या काळात घरी पोहचेपर्यंत मोबाईलचा वापर जपून वापरावा, त्याची बॅटरी डिस्चार्ज होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर चांगली powerbank सोबत ठेवावी.३, चालताना आसपास पाण्याच्या जागा असतील तर त्या पाहून ठेवाव्यात. पाणी संपून घसा कोरडा पडला तर मिळेल ते पाणी पिण्यास कचरू नये. **पाण्याने infection झालं तर ते Cure करता येते, पण dehydration चे परिणाम त्यापेक्षा वाईट असतात.**४, रात्री उघड्यावर राहायची वेळ आली तर सोबत आणलेला जादा कपड्याचा जोड घालून झोपावे, थंडी कमी लागेल. कपड्याचा जोड नसल्यास सॅक मध्ये पाय घालून झोपावे.४, झोपताना रात्री पायातील बूट न काढता झोपल्यास उत्तम.५, उघड्यावर रात्र काढायची वेळ आलीच तर थोडा आडोसा पाहून झोपावे, त्यामुळे गार वारा लागणार नाही.६, अशी अपरात्र टाळता येणे शक्य नसल्यास काळोख पडायच्या आधीच थांबून सुरक्षित जागा पाहून मुक्काम करावा. कड्याच्या धारेवर, तीव्र उतारावर, गर्द रानातला मुक्काम टाळण्याचा प्रयत्न करावा. जरा उघडी जागा पाहावी व रात्र काढावी.७, आपल्याकडे, सह्याद्रीत रात्र काढावी लागली व खूप थंडी वाजली तरी बिथरून जाऊ नये, **इथली थंडी हिमालयातील थंडी सारखी जीवघेणी नाही हे मनात पक्क लक्षात ठेवावं. त्यामुळे रात्री त्रास होईल पण जीव जाण्याची भीती नाही. त्यामुळे panic होऊ नये.**८, बऱ्याच वेळा नवागतांच्या पायातील चप्पल वा shoes दगा देतात व त्यांचा चालण्याचा वेग कासावा सारखा होऊन वेळेचे अंदाज चुकतात. म्हणून सोबत असलेल्या जाणत्या व्यक्तीने जादा चप्पल वा shoes चा एक तरी जोड सोबत ठेवावा.९, वाट चुकल्यामुळे अवघड जागेवरून चालताना, स्क्री वरून उतरताना नवीन लोकांचा खूप वेळ जातो, अशावेळी त्यांना हात देऊन – मदत करून वेळ वाचववा, दिवसाच्या उजेडाचा चांगला वापर करावा.१०, डोंगरातील दिवसाचा-प्रकाशाचा वेळ अमूल्य असतो तो जास्तीत जास्त वापरायल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.११, बाहेर, उघड्यावर, अपरिचित जागेत रात्र काढायची वेळ आलीच तर सोबत असलेल्या लहान मुलांची व  नाजूक व्यक्तींची प्रथम काळजी घ्यावी. खाणं व पाणी असल्यास प्रथम त्यांना द्यावे.१२, अनोळखी डोंगर दऱ्यातुन रात्री वाट काढण्याचा अननुभवी व्यक्तीने प्रयत्न करू नये. काळोख पडण्यापूर्वीच सुरक्षित जागा पाहून थांबावे.१३, आपण चुकून, वाटा हरवून खूपच वेळ लोटला असेल तर गोंगाट टाळून माणसांच्या, कुत्र्याच्या आवाजाचा कानोसा घ्यावा.  जवळ गाव -वस्ती असेल तर कुत्र्यांच्या भूकंण्याचा आवाज कानावर  येतो त्यामुळे वस्तीची दिशा व अंतर कळू शकते. आपल्याला कोणी शोधत आले असेल तर त्यांच्या हाका सुद्धा ऐकू येऊ शकतात.१४, रात्री कोणी शोधायला आलेच तर आपल्याजवळील टॉर्चच्या झोताने आपले अस्तित्व दाखवून ठेवावं.१५, मोबाइल चालू असेल व शक्य असेल तर स्वतःचे लोकेशन पाठवावे.१६, शक्य असेल तर, आणि खालचे गाव-वस्ती दिसत असेल तर त्याचा फोटो काढून पाठवावा. या फोटोवरूनही जाणकार भटके तुमचे लोकेशन समजू शकतात.१७, **वाहते ओढे, खोल डबकी, धबधब्यांचे प्रवाह आणि बेलाग कडे यापासून दूर राहावे. एवढी काळजी घेतली तर सह्याद्री मुळीच जीवघेणा नाही.**
 धीर ठेवा तुमच्यापर्यंय नक्कीच मदत पोहचेल.
  –धनंजय मदन,निसर्गमित्र, पनवेल Nisargamitra Panvel

— Below by google translate

Recently, due to time planning in Harikchandra fort’s Konkanadada area, some mountain crew had to leave the darkness in the night.
There is no time to come and just want to mention some points for what to do.
** This information is for newcomers, seasoned wanders should add more emphasis to newcomer nature. **

1, even though there are many small and easy treks, there should be a flashlight, a pair of clothes, a little food and two bottles of water in your sack.
2, Keep the use of mobile usage while traveling at home during wandering, and do not have battery discharges. If possible, keep up with a good powerbank.
3, Keep it visible if there are outdoor water around running. If the throat becomes dry by water, it will not get so damaged. ** It can be cured if water gets infected, but the effects of dehydration are worse than that. **
4 If the time is right for the night to be open, then add a pair of extra-covered clothing to sleep and take cold. If you do not have a pair of clothes, then take a foot in the sack and sleep.
4, Better sleep if you do not sleep at night while sleeping.
5, when it’s time to open the night, go to bed for a little while, so there will be no wind blown.
6, if it can not be prevented, then stay awake before darkness and stop by seeing the safe place. Attempt to avoid strangles on the stairs, on the extreme slopes, the roaring forest. See the open space and leave the night.
7, we need to stay in the Sahyadri night and do not get biltered even if it is very cold. ** Remember that the cold winter is not like the cold winter Himalayas. There will be trouble in the night, but there is no fear of going away. So it should not be panic. **
8, Many times the shoes and shoes on the feet of the newcomers cheat, and the timing of the running speed will be like that. Therefore, the person with the knowledge should keep one pair of extra sandal or shoes together.
9, Walking through difficult places, walking through difficult places, new people spend too much time on the screen, by giving them hands – helping them save time, use the light of daylight.
10, the time of light in the mountain-time is invaluable, such incidents can be avoided if maximum use is used.
11, First, take care of the children and the fragile persons accompanying the time when the time is about to leave night in the open, open, open space. If there is water in both mine and water, then they should be given first.
12, the inexperienced person should not try to walk through unidentified mountain ranges. Stop watching the safe place before it gets dark.
13, if we have lost a lot of time, if we have lost a lot of time, then avoid the noise and take the ears of men and dogs. If there is a village nearby, then the voice of the dogs can be heard on the ears so that the direction of the direction and distance can be known. If you have been looking for someone you can hear them.
14, if someone comes to find the night, then you should show your presence with the flashlight on your side.
15, Mobile is on and if possible, Send your own location.
16, if possible, and the bottom of the village is visible, then send the photo of it. The savvy can understand your location from this photo too.
17, ** Keep moving, flutter, deep dive, stay away from waterfalls and belig. Sahyadri is not fatal at all.

Be patient and be sure to help you.

  • Dhananjay Madan,
    Nativam Mitra, Panvel

One thought on “Information for new trekkers, seasoned wanders

  1. Very useful pointers! I compiling a post about the basic precautions one needs to take while trekking in the Sahyadris along with how to go about planning and researching for one. I’ll definitely add a link to this post.
    Great work. Cheers!

Leave a Reply