Kudal fort |  Kokan forts | Maharashtra forts |

कोकणातील अनेक भुईकोट काळाच्या ओघात नष्ट झाले असुन आज या कोटांचे उल्लेख केवळ इतिहासाच्या पुस्तकात आढळुन येतात. इतकेच नव्हे तर स्थानीक लोकदेखील या कोटाबाबत वा त्याच्या माहितीबद्दल अनभिज्ञ आहे. अशा अनेक भुईकोटापैकी एक भुईकोट म्हणजे कुडाळचा किल्ला. कुडाळ शहर सावंतवाडी पासुन १० कि.मी.अंतरावर तर मालवण पासुन १५ कि.मी.अंतरावर आहे. कुडाळ बसस्थानका समोर असलेला हा किल्ला स्थानिकांना जराही परिचित नसल्याने किल्ला न विचारता घोडेबाव विहीर म्हणुन चौकशी करावी. घोडेबाव विहीर हि किल्ल्याच्या आतील भागात असुन कुडाळ किल्ल्याचा हा एकमेव अवशेष आज शिल्लक आहे.

Leave a Reply