भटकंती कट्टा ७ – एक मंतरलेला कट्टा ९ ऑक्टोबर २०१५

डोंगर दर्याटतून भटकणे म्हंटल्यावर, रात्री
अपरात्री आडवाटा तुडवणे, अनेक किल्ले, गुहा, शाळा,
मंदिर यात राहणे हे सर्व ओघाने आलेच.
यासगळ्यातील मजा आपल्यासाठी
नवखी नाहीच.गेल्या अनेक वर्षाच्या
भटकंतीमधील अनेक अनुभव आपल्या
सगळ्यांच्या गाठीशी आहेत.
काहीना चांगले तर काहीसाठी
थरकाप उडवून देणारे.
तशी आपली ट्रेकर जमात विज्ञानाला
जोडून बोलणारी आणि चालणारी, पण
अश्या काही घटना घडतात ज्यांची
विज्ञानाशी सांगड घालणे कठीण होऊन
बसते.
असे अनेक मंतरलेले अनुभव या वेळी आपल्या
कट्यावर मांडले जाणार आहेत किंबहुना आपण ते मांडणार आहोत
आणि याला जोड असेल शास्त्राची.
“ अनुभवातून शिकतो तो शहाणा” या म्हणी नुसार अशा
घटनांची शास्त्रीय, मानसिक आणि
व्यक्तीसापेक्ष कारणमीमांसा करण्याचा
आपला प्रयत्न असणार आहे.
तरी न चुकता या वेळीच्या कट्ट्याला
अवश्य या आणि सोबत तुमच्या अनुभवाशी
शिदोरी आणायला विसरू नका.
दिनांक: शुक्रवार ९ ऑक्टोबर २०१५
वेळ – सायंकाळी ६.३० वाजता
ठिकाण – मामा काणे सभागृह, दादर ( पश्चिम )
*कट्यानंतर भटकंती व इतिहासाशी
संबंधित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध
असतील.
*सर्व भटक्यांची उपस्थिती
प्रार्थनीय राहील.

भटकंती कट्टा ७ – एक मंतरलेला कट्टा.डोंगर दर्याटतून भटकणे म्हंटल्यावर, रात्रीअपरात्री आडवाटा तुडवणे, अनेक किल्ले,…

Posted by Chetan Ramesh Rajguru on Sunday, October 4, 2015