१६ वे गिरिमित्र संमेलन Girimitra Sammelan

नमस्कार गिरिमित्रांनो,

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपण भेटणार आहोत – ‘गिरिमित्र संमेलना’च्या निमित्ताने ! यंदाचं संमेलन
दि. ८ व ९ जुलै २०१७ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यंदाची मध्यवर्ती संकल्पना आहे – ‘साहसाची परिसीमा’.

अज्ञाताचा शोध घेण्याची माणसाची प्रेरणा जितकी आदिम, तितकीच साहसाची ओढ देखील. याच साहसातून त्यांने डोंगर ओलांडले, महासागर पार केले आणि आकाशालादेखील गवसणी घातली. निसर्गाचा मान राखत त्याच्या अंगाखांद्याावर खेळताना त्याने स्वत:ला आजमावल. शाररीक-मानसिक क्षमतेचा कस लावणाऱ्या गिर्यारोहणासारख्या एका अफाट साहसी खेळाला जन्माला घातलं. आपल्या साऱ्याच क्षमतांचा कस तर येथे कायमच लागतो. सहजसाध्य असं काहीच नाही. पण त्यातदेखील जाणीवपूर्वक एखादं नवं आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी आपल्यात असते.

 

मग एखादा डोंगरवेडा हिमशिखरावर एकट्याने जातो, तर कोणी अतिउंचावरील हिमशिखरावर कृत्रिम प्राणवायूच्या गरजेवर मात करतो, तर एखादा चक्क कृत्रिम पायांच्या जोरावर हिमशिखरांना गवसणी घालतो, एखादा अत्यंत वेगाने एखादा कडा येंगून जातो, कोणी महिनोंमहिने पाठीवर सामान लादून डोंगर भटकू लागतो. एक ना दोन. आपली घुमक्कड मंडळी सतत असं काही ना काही करतच असतात.

अर्थातच हे करताना त्यातील धोक्यांची जाणीव ठेवत मोजूनमापून घेतलेली जोखीमच असते ती. कॅलक्युलेटेड रिस्क. कोणाची जोखीम कमी, कोणाची खूपच अधिक. साहसाची सीमा प्रत्येकाने ठरवून घेतलेली. पण कधी कधी आपण साहसाची परिसीमादेखील गाठतो. अगदी ठरवून. ही साहसाची परिसीमाच तुम्हाला एका अत्युच्च आनंदाला पोहचवते. डोंगरभटक्यांचं सारं आयुष्य व्यापून उरते. धोका, साहस आणि आनंद अशी साखळी आणखीनच दृढ होत जाते. म्हणूनच १६ व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे ‘साहसाची परिसीमा’ !

विशेष आनंदाची बाब म्हणजे साहसाची परिसीमा गाठणारी गिर्यारोहक गेरलिन्ड कल्टेनब्रुनर यावर्षीच्या संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. कल्टेनब्रुनर हिने आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या सर्व १४ शिखरांवर यशस्वीरित्या आरोहण केले आहे. विशेष म्हणजे ही सर्व आरोहणं कृत्रिम प्राणवायूशिवाय आणि अतिउंचावरील भारवाहकांच्या मदतीशिवाय करण्यात आली आहेत. संमेलनात त्यांच्या मोहिमांचे विशेष सादरीकरण तर असेलच, पण डोंगरभटक्यांना त्यांच्याशी संवाददेखील साधता येईल.

संमेलनाची सर्वसाधारण रुपरेषा

दिनांक : ०८ जुलै २०१७ – सायंकाळी : ५.०० ते ९.००
> दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धेतील निवडक सादरीकरणे
> मुलाखत – मुख्य अतिथी गेरलिन्ड कल्टेनब्रुनर

दिनांक : ०९ जुलै२०१७ – सकाळी : ९.०० ते सायंकाळी ६.००
> गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा
> विशेष सादरीकरण – मुख्य अतिथी गेरलिन्ड कल्टेनब्रुनर
> मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम
> विशेष सादरीकरण – ‘वॉकिंग ऑन द एज’
> दृक्श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे
> दुर्गसंवर्धन आणि शासकीय यंत्रणा – डॉ. तेजस गर्गे
> पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन
> ट्रेकर ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण
> अभ्यासपूर्ण दृक्श्राव्य सादरीकरण
> प्रश्नमंजुषा

प्रवेशिका देणगी मुल्य रु. ६००/- फक्त
(समाविष्ट – दि.८ जुलै सायं चहा, भोजन, दि. ९ जुलै सकाळ चहा, नाष्टा, भोजन)

संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळी केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकतो. प्रवेशिका वितरणात प्रथम नोंद करणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील.

नोंदणी अधिक माहितीकरिता संपर्क:
मुकेश मैसेरी – ९८६९ ०२१ ६२१, प्रसाद जोशी – ९९२० ८०६ ६९९

याव्यतिरिक्त छायाचित्रण, दृक- श्राव्य सादरीकरण, पोस्टर, प्रश्नमंजुषा या स्पर्धाही घोषित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांची सविस्तर माहिती ‘गिरिमित्र संमेलन’ वेबसाईट व फेसबुक पेज वर मिळवा आणि जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा !

तेव्हा लवकरच भेटू पुढील अपडेटसह…

– टीम गिरिमित्र

 

 

Our mailing address is:
Girimitra Sammelan,
Maharashtra Seva Sangh, Pandit Jawaharlal Nehru Road, Mulund West, Mumbai 400080,India