| mumbaihikers |
Loading Events

« All Events

  • This event has passed.

Hirvai’s Ranthambhore Jungle Safari 15th Feb to 21st Feb 2018

February 15 @ 6:00 pm - February 21 @ 7:00 am

“हिरवाई आयोजित रणथम्भोर जंगल सफारी १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१८”
आपल्या भारतात जवळपास ११० राष्ट्रीय उद्याने आहेत, तसेच ४० च्या आसपास संरक्षित व्याघ्रप्रकल्प आहेत व आपल्या भारतात विविध प्रकारची जैवविविधता आढळून येते.. ह्या जैवविविधतेचा व भारतीय वन्यजीवनाचा मानबिंदू म्हणजे “पट्टेरी वाघ”… ह्या “पट्टेरी वाघाला” अनुभवायचे असेल तर राजस्थानातील सवाई माधोपुर येथील “रणथम्भोर व्याघ्र प्रकल्प” हा उत्तम ठिकाण होय.. हा व्याघ्र प्रकल्प गाजला तो तेथील “मछली, नूर, उन्नीस, गायत्री, ब्रोकन टेल” ह्या वाघिणी आणि “उस्ताद, स्टारमेल, सुलतान” ह्या वाघांमुळे…ह्यातल्या “मछलीवर” तर आजवर सर्वात जास्त फिल्म्स हि बनवल्या गेल्या.
ह्याच राष्ट्रीय उद्यानात आजमितीला ६८ वाघांचे साम्राज्य पसरलेले आहे. तसेच ह्या राष्ट्रीय उद्यानात “बिबट्या, कोल्हे, चितळ, भेकर, सांबर, वानर, अस्वल, मगरी” असे २० हून अधिक सस्तन प्राणी व २५५ हून अधिक पक्ष्यांचे साम्राज्य अनुभवता येते. करकरणारी “धोंक वृक्षांची वनराई” व “राजबाघ, पदम व मलिक तलावांच्या” आजूबाजूला अनुभवता येणारे वन्यजीवन यामुळे “रणथम्भोर राष्ट्रीय उद्यानाला एक अनोखे परिमाण लाभले आहे. त्यामुळे इथे येऊन “वन्यजीवनाचा” आस्वाद घेणे व “भारतीय पट्टेरी वाघ” अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
हे खरेखुरे जंगल बुक अनुभवण्यासाठी “हिरवाई” ह्या वन्यजीवन व निसर्ग संवर्धनाच्या तसेच पर्यटनाच्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्थेने एका आगळ्यावेगळ्या जंगल सफरीचे आयोजन १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१८ ह्या कालावधीत केले आहे. ह्या सफारीत “८ सफारींच्या” माध्यमातून “रणथम्भोर राष्ट्रीय उद्यानात” भटकंती करता येणार आहे…ह्या जंगल सफारीत सुप्रसिद्ध वन्यजीव संशोधक व प्रकाशचित्रकार सौरभ महाडिक हेही सहभागी होऊन वन्यजीव छायाचित्रणाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या जंगल सफारीत सहभागी होण्यासाठी ०९६१९७५२१११ व ०९६१९२४२८९७ संपर्क करावा. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ह्या सफारीचे सहभाग शुल्क २८५००/ आहे. १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत ह्या सफरीत सहभागी होण्यासाठी बुकिंग करता येईल…
हिरवाई…
०९६१९७५२१११
०९६१९२४२८९७
हिरवाई आयोजित रणथम्भोर जंगल सफारी १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१८…
# १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मुंबई सेंट्रलवरून ६.५० वाजता थ्री टायर ए सी “जयपूर सुपरफास्ट” रेल्वेने राजस्थानातील “सवाई माधोपुर” येथे प्रयाण…
# १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सवाई माधोपुर येथे पोहोचणार.
# सवाई माधोपुर रेल्वे स्टेशनहून ४५ मिनिटांचा “टायगर मून” रिसोर्टसाठीचा प्रवास.
# “टायगर मून” ह्या प्रसिद्ध व निसर्गाने नटलेल्या व रणथम्भोर राष्ट्रीय उद्यानापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ए सी रिसोर्ट मध्ये राहण्याची व्यवस्था..
# १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पहिली जंगल सफारी.
# १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व संशोधक सौरभ महाडिक यांचा वन्यजीवनावर आधारित गप्पांचा कार्यक्रम…
# १७ फेब्रुवारी रोजी सकाळी व संध्याकाळी २ जंगल सफरींची व्यवस्था…
# १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी “रणथम्भोर” राष्ट्रीय उद्यानावरील आधारित फिल्म सहलीत सहभागी झालेल्या पर्यटकांना पाहता येईल…
# १८ फेब्रुवारी रोजी सकाळी व संध्याकाळी २ जंगल सफरींची व्यवस्था…
# १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी राजस्थानी स्थानिक कलाकारांचे मनोरंजनपर कार्यक्रम…
# १९ फेब्रुवारी रोजी सकाळी व संध्याकाळी २ जंगल सफरींची व्यवस्था…
# १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी “दस्तकारी” ह्या राजस्थानची ओळख करून देणाऱ्या स्थानिक स्त्रियांनी चालवलेल्या एन जी ओ ला भेट…
# २० फेरबुवारी रोजी सकाळी एका जंगल सफरीची व्यवस्था…
# २० फेब्रुवारी रोजी सकाळी जगप्रसिद्ध रणथंभोर फोर्ट ला भेट देण्यासाठी एक सफारी…
# २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता सवाई माधोपुरहून मुंबईकडे थ्री टायर ए सी “जयपूर सुपरफास्ट” ह्या रेल्वेने मुंबईकडे परतीचा प्रवास…
# २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता बोरीवली( मुंबई) येथे सहली समाप्त होईल…
# ह्या जंगल सफरीमध्ये सहभागी होण्यासाठी ०९६१९७५२१११ व ०९६१९२४२८९७ वर १५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत संपर्क साधता येईल…प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल…मर्यादित जागा उपलब्ध…
हिरवाई…
०९६१९७५२१११/ ०९६१९२४२८९७.

Details

Start:
February 15 @ 6:00 pm
End:
February 21 @ 7:00 am
Event Category:

Venue

Hirvai Nature Nd Wildlife Tourism
borivli
Mumbai, IN
+ Google Map

Organizer

Hirvai Nature Nd Wildlife Tourism
Website:
https://www.facebook.com/hirvai09/